- एमआयडीसीकडून शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२१) :- राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. २५) करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे.
त्यामुळे एमआयडीसीकडून शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, व्हीएसएसएनएल, दिघी, तळवडे, चाकण, देहूरोड, कॅन्टोन्मेट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर बंद राहणार आहे.
शुक्रवारी (दि.२६) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. कातवाड यांनी केले आहे.