- शहरातील कोरोना योद्ध्यांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२१) :- करोनाची लस घेतल्यानंतर तीन जणांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. हे तीनही रुग्ण पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशी असून आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामध्ये एक खासगी डॉक्टर व कर्मचारी तर पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे.
या तीनही रुग्णांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. चार दिवसांपूर्वीच शहरातील एका पोलीस अधिकाऱ्यालाही लस घेऊनही करोनाची लागण झाली आहे. लस घेऊन अशा चार जणांना करोनाची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
या तिघांचाही लसीचा दुसरा डोस बाकी होता. साधारणपणे लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा लसीचा बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. मात्र यांचा दुसरा डोस बाकी होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. पवन साळवे यांनी दिली.