- माजी सैनिकांचे पथक, दुर्गा ब्रिगेडही सज्ज…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मास्कविना फिरणाऱ्यांवर पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असून, शहरातील ८५ चौकांत टास्क फोर्स असणार आहे.
प्रभागस्तरीय पथकाबरोबरच माजी सैनिकांचे पथक, दुर्गा ब्रिगेडही सज्ज करण्यात आली आहे, त्यासाठी तीस टक्के इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.
पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. या वेळी वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त श्रीकांत देसले, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपवैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे आदी उपस्थित होते.


















