न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- फेसबुक मैत्री करून जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरातील महिलांशी मैत्री करत सम्राट पारखे या ठगाने आपण जनहित मानवाधिकार या राष्ट्रीय संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत ओळखपत्र देण्याच्या नावाखाली आर्थिक लूट केलीच, पण काही महिलांनी या भामट्याचा खरा चेहरा उघडा पाडल्यावर या भामट्याने महिलांची बदनामी सुरू केली. अखेर एका पीडितेने या भामट्या विरोधात ओतूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरातील महिलांना फेसबुक व व्हाट्स अप वर मैत्री करून सम्राट पारखे यांनी ओळख वाढवून जनहित मानव अधिकार या संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगून या संस्थेवर काम करण्याचा आग्रह धरला तसेच आरोपीने स्वतःची अनाथ व गरीब मुलांची संस्था असून या महिलांनी या संस्थेत प्रबोधन करावे अशी विनंती केली आणि पुढे जाऊन बदनामी केल्याचा प्रकार उघड झाला असून ओतूर पोलिसात उदापुर परिसरातील एका पीडित महिलेने सम्राट पारखे विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी पारखे वर गुन्हा दाखल केला आहे. पारखे च्या ओळख पत्रावर सिडको,नाशिक पवना नगर असा पत्ता आहे.
आरोपीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून या फिर्यादी व इतर महिलानी एकमेकांशी संपर्क साधून एकमेकांना भेटून सम्राट पारखेने इतर महिलांशी ओळख करून दिली. त्यानंतर इतर महिलांना पारखे ने जनहित राष्ट्रीय मानव अधिकार संस्थेचे ओळखपत्र देतो. तुम्ही प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करा व मला द्या असे सांगितले. परिसरातील महिलांनी पारखे ला पैसे जमा करून दिले. त्यानंतर तो जे काम करत होता या कामाची पीडित पाहिलेला शंका आल्याने या महिनेने पारखेची माहिती काढलीं असता पारखे हा संस्थेच्या नावाखाली महिलांना फसवत आहे हे समजल्या नंतर पीडित महिलेने राजीनामा देऊन काम करण्याचे सोडले.
दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी २.४५ वाजता पीडितेच्या मोबाईल व्हाट्स अप वरील रिपब्लिकन आठवले गृप यावर पारखे याने त्याच्या मोबाईल वरून पीडितेच्या बाबतची लिंक पाठवून त्यात पीडिता फ्रॉड आहे. चुकीच्या मार्गाने काम करते. ऑफिसर लोकांना महिला पुरवते, धंदा करते तसेच वेळोवेळीं या गृप वर तसेच इतर महिलांच्या व्हाट्स अप वर पीडित महिला वाईट आहे. धंदा करते असे सांगून बदनामी करून मोबाईल वर मेसेज करून बदनामी कारक मेसेज केला, पारखेने वेळोवेळी अश्लील भाषेत संभाषण करून बदनामी करून तुझे कपडे काढलेले फोटो अपलोड करतो असे सांगून पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडित महिला व इतर महिलाकडून पारखे याने जनहित मानव अधिकार या संस्थेचे ओळखपत्र देऊन प्रत्येकी ५ हजार रु. या प्रमाणे एकूण ६५ हजार रु घेऊन ओळखपत्र न देता फसवणून केली आहे. तसेच पीडितेवर जातीयवाचक केस करेल अशी धमकीही दिली. हा प्रकार २७ एप्रिल २०२० पासून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वेळोवेळी घडल्याने पीडित महिनेने सम्राट पारखे विरोधात ओतूर पोलिसात तक्रार दिली आहे.