- ६ महिने कारावास व दंडाची शिक्षा; पालिकेचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मार्च. २०२१) :- इ. स. २०२५ पर्यंत आपला देश क्षयरोग मुक्त करावयाचा आहे. त्यामुळे भारत सरकारने क्षयरोगास गंभीर धोकादायक यादी मध्ये घेऊन, भारत राजपत्र १९ मार्च २०१८ नुसार सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिक, पॅथोलॉजीलॅब, रेडिओलॉजीस्ट व औषधविक्रेते यांना त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद (Notified) विहीत नमुन्यात शासनाकडे करणे बंधनकारक केली आहे.
माहिती लपविणार्यावर फौजदारी केली जाणार आहे. अशी माहिती महापालिकेचे अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली. त्यामुळे नवीन निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती शहर क्षयरोग अधिकारी व जीत संस्था यांना कार्यालय ई – मेल – dtomhpim@rntcp.org, जीत संस्था ई – मेल – jeetpcmc@gmail.com या ई – मेल वर दर महिन्याच्या २५ तारखेपर्यंत कळविण्यात यावी.
तसेच उपरोक्त बांबीची पुर्तता न झाल्यास इंडियन पिनल कोड (४५/१८६०) अन्वये आणि याबाबत सर्व खासगी वैद्यकिय व्यावसायिकांवर कलम २६९ अन्वये निष्काळजीपणे जिवीतास हानी पोहचवणा-या रोगाचा फैलाव होणे, ६ महिने कारावास / दंड व दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कलम २७० अन्वये घातक कृत्यामुळे जिवीतास हानी पोहचणा-या रोगाचा फैलाव करणे, १ वर्ष कारावास / दंड व दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
















