- अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. मार्च २०२१) :- फिर्यादी काळभोर यांची ज्योतिबानगर तळवडे येथे कोहिनूर इंडस्ट्रीज कंपनी आहे. ९ मार्च दुपारी तीन ते १२ मार्च सायंकाळी पाच या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कंपनीत चोरी केली.
१५ लाख रुपये किमतीचा हॅमर मशीनचा बेस आणि साडेसात लाख रुपये किमतीचा हॅमर मशीनचा बेस तसेच दोन लाख रुपयांचे सहा लोखंडी ऑइल टॅंक असा एकूण २४ लाख ५० हजारांचा ऐवज चोरून नेला.
शंकर नामदेव काळभोर (वय ६१, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
















