न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १३ मार्च) रोजी ८११ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४८७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – मोशी (६५ वर्षे), वल्लभनगर (८१ वर्ष) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – आळंदी ( ७५ वर्षे ), आगरकरवाडी (८१ वर्ष) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११३१८१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०४८५३ वर पोहोचली आहे.
आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८७२ जणांचा मृत्यू झालेला आहे. प्रभागनिहाय रुग्णसंख्या अ – १२५, ब – १०६, क – १०२, ड – १५२, इ – १११, फ – ६९, ग – ६७, ह – ७९ एकुण – ८११ अशी आहे.
















