- आढळरावांविरोधात वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची केली एकमुखी मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. मार्च २०२१) :- शिवसेना उपनेते तथा, संपर्कप्रमुख व माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी त्यांच्या लोकसभेतील १५ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक प्रकल्प मार्गी लावले. त्यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प. या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचे काम दीड वर्षापूर्वी खासदार झालेले अमोल कोल्हे व त्यांचे समर्थक करत आहेत. हे श्रेय घेण्याच्या नादात त्यांचे मोठे भाऊ सागर कोल्हे यांनी लोकनेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यावर अर्वाच्च भाषेत सोशल मीडियावर टीका केली आहे. या विरोधात भोसरी विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये खा. अमोल कोल्हे यांचे मोठे भाऊ सागर कोल्हे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले.
शिवसेना उपनेते तथा, संपर्कप्रमुख व माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी त्यांच्या लोकसभेतील १५ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक प्रकल्प मार्गी लावले. त्यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प. या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचे काम दीड वर्षापूर्वी खासदार झालेले अमोल कोल्हे व त्यांचे समर्थक करत आहेत. हे श्रेय घेण्याच्या नादात त्यांचे मोठे भाऊ सागर कोल्हे यांनी लोकनेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यावर अर्वाच्च भाषेत सोशल मीडियावर टीका केली आहे.
अनेक वर्ष राजकारण करत असताना सुसंस्कृतपणा दादांनी कायम दाखवला. परंतु, आपण शिवसैनिक म्हणून आपल्या नेत्यावर होणारी अर्वाच्च भाषेतील टीका आम्ही सहन करणार नाही. सागर रामसिंग कोल्हे यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक व राजकीय सलोखा बिघडण्याचे काम केले आहे. सागर कोल्हे राहात असलेल्या इंद्रायणीनगर भागातील भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांना सागर कोल्हे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना महिला संघटिका सुलभाताई उबाळे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, जिल्हा संघटक तुषार सहाणे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी सुरज लांडगे, युवा सेना जिल्हा समन्वयक सचिन सानप, समन्वयक दत्तात्रय भालेराव, विभाग प्रमुख विश्वनाथ टेमगिरे, योगेश बोराटे, रावसाहेब थोरात, संजय यादव, युवा सेनेचे कुणाल तापकीर, नितीन बोंडे, महिला आघाडी कल्पना शेटे, सुरेखा बांगर, ज्येष्ठ शिवसैनिक गुलाबराव आल्हाट, निवृत्ती अमुप, विपुल टेहरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


















