- पालिका प्रशासनाकडून कचरावेचक कामगारांची फरफट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोरेवस्ती येथील कचरा संकलन रॅम्प येथे काम बंद आंदोलन केले.
कोरोना संकट काळातही जीवाची पर्वा न करता शहरातील घाण संकलित केल्यानंतरही कंपनीने किमान वेतन दरानुसार, तसेच वेळेवर पगार देत नसल्याचा आरोप करत या कामगारांनी “काम बंद” आंदोलन करून शनिवारी (दि.१३) निषेध केला.
कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून प्रत्येक महिन्याला केलेल्या कामाचा मोबदलाच कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे रखडलेला पगार मिळावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाला कचरावेचक कामगारांचा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही का? अशा गोष्टींमुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. याची पालिकेने तात्काळ दखल घ्यावी, अशी खदखद यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
















