- मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे विभागप्रमुखांना आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मार्च २०२१) :- महापालिकेच्या विविध विकासकामांपोटी ठेकेदारांकडून सादर केली जाणारी बिले २६ मार्चपर्यंत सादर करता येणार आहे. बिलांची संख्या लक्षात घेता त्यांचा निपटारा करण्यासाठी ५ दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. बिले सादर करण्याची सूचना मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी सर्व विभागप्रमुखांना केली आहे.
सन २०२०-२१ हे आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसच राहिले असताना काही विभागांनी त्यांच्याकडील चालू आर्थिक वर्षातील भांडवली व महसुली कामांची बिले लेखा विभागाकडे सादर केलेली नाहीत. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये शेवटच्या २ ते ३ दिवसांत मोठ्या प्रमाणावर बिले लेखा विभागाकडे सादर केली जातात.
सर्व प्राप्त बिले ही ३१ मार्चपर्यंतच अदा करायची असल्याने लेखा विभागास बिले तपासणीसाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. त्यामुळे चालू वर्षातील विभागाकडील सर्व प्रकारची बिले २६ मार्चपर्यंत सादर करण्याची सूचना लेखा विभागाने केली आहे.
















