- पिंपरी चिंचवड पोलिसांचा दंडुका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मार्च २०२१) :- शहरात कोरोना वाढत असल्याने खबरदारी घेण्यासाठी मास्क वापरण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अनेकजण या नियमांना पायदळी तुडवून विनामास्क फिरताना आढळतात.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी ५३४ जणांवर विनामास्कची कारवाई केली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी एमआयडीसी भोसरी (६०), भोसरी (२२), चिंचवड (६८), निगडी (५८), आळंदी (४५), चाकण (४०), दिघी (२२), म्हाळुंगे चौकी (३६), सांगवी (५१), वाकड (६३), हिंजवडी (२०), देहूरोड (१६), तळेगाव दाभाडे (०१),चिखली (०७), रावेत चौकी (११), शिरगाव चौकी (१४) परिसरातील बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली.
















