- पालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये बेडची उपलब्धता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मार्च २०२१) :- कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी महापालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये बेडची पुरेशी उपलब्धता आहे. त्यामुळे जम्बो कोविड केअर सेंटर चालू करण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
महापालिकेकडे बेडची उपलब्धता पुरेशी आहे. १५ हजार खाटा आहेत. त्यामुळे तूर्त जम्बो कोविड केअर सेंटर चालू करण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.
















