- नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मार्च २०२१) :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ( एमआयडीसी ) रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. १८) सकाळी ते सायंकाळी ६ या वेळेत करण्यात येणार आहे त्या दिवशी एमआयडीसीकडून शहराच्या विविध भागात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. १९) पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होणार आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, कासारवाडी, देहुरोड, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अॅण्ड डी, दीघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील नागरिकांनी नोंद घेऊन पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस.व्ही.कोतवाड यांनी केले.