- अज्ञात चोरट्यांकडून तीन दुचाक्यांची चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीत अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १६) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माणिक दत्तू पवार ( वय ४६, रा. खराबवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची २० हजारांची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या शेजारी पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार रविवारी (दि.१४) रात्री ११ ते सोमवारी (दि. १५) सकाळी नऊच्या दरम्यान घडला.
विशाल श्रीमंत जगदाळे (वय २८, रा. चिंचेचा मळा, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची ३० हजारांची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार शनिवारी (दि.१३) रात्री १० ते रविवारी (दि. १४) सकाळी सातच्या दरम्यान घडला. आकाश अर्जुन शिंदे (वय २७, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची १५ हजारांची दुचाकी काळेवाडी येथील धनगरबाबा मंदिरासमोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली आहे. वाहनचोरीचा हा प्रकार ११ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान घडला.















