- थेरगावमधील घटना; वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. मार्च २०२१) :- फिर्यादी हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी बुधवारी सायंकाळी सव्वासात वाजता घराबाहेर गेले. आईला भेटून ते रात्री सव्वादहा वाजता परत घरी आले. दरम्यान च्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात कोयंडा तोडून प्रवेश केला.
घरातून दोन लाख ८२ हजार रुपये किमतीचे ७३.९०९ ग्रॅम वजनाचे करून नेले. ही घटना बुधवारी (दि. १७) सायंकाळी सव्वा सात ते रात्री सव्वा दहा या कालावधीत शिवदर्शन कॉलनी, थेरगाव येथे घडली.
प्रशांत शांताराम मोरे (वय ३३) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.















