- पालिका देणार प्रति माह प्रति कर्मचारी २४ हजार पगार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२१) :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दींमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहे. लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. ही गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाच रखवालदार व मदतनीस नियुक्त करण्यात येणार आहेत. ४४ मदतनीसांसाठी प्रति महिना प्रति कर्मचारी २४ हजार ५१ रुपये यानुसार साडेदहा लाख खर्च होणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका सुरक्षा क्षेत्रीय विभागामार्फत महापालिका मालमत्तांच्या सुरक्षेसाठी ठेकेदारी पद्धतीने काम दिले आहे. नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्यामार्फत रखवालदार मदतनीस पुरविण्यात येणार आहेत.
कोरोना संसर्गाच्या पाश्वभुमीवर महापालिकेतर्फे आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दींमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी कर्मचारी, नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे तेथे नियुक्त असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दींमध्ये लसीकरण केंद्रांवरील गर्दी आटोक्यात आणण्यात मदत होणार आहे.
















