- आर. के. लुंकड बिल्डर्सकडून विनामोबदला इमारतींचे बांधकाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) चाकण विभाग कार्यालय आणि च-होली पोलीस चौकीचे आज मंगळवारी (दि. २३) रोजी उद्घाटन झाले.
यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त राम जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, मे. आर. के. लुंकड बिल्डर्स अँड प्रमोटर्सचे राजेंद्र लुंकड आदी उपस्थित होते.
राजेंद्र लुंकड यांनी विना मोबदला एसीपी कार्यालय आणि पोलीस चौकीच्या इमारतीचे बांधकाम करून दिले आहे. च-होली परिसरात अधिक सक्रिय पोलिसिंग करण्यास या चौकीची मदत होणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
















