- मूळ कर्तव्याच्या ठिकाणी रुजू होण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा पथकातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली केलेल्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात सामाजिक सुरक्षा पथकात नेमणूक केली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ कर्तव्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
बदली झालेले कर्मचारी (बदलीचे ठिकाण)
पोलीस हवालदार संदीप गवारी (भोसरी), पोलीस नाईक दीपक साबळे (भोसरी), पोलीस हवालदार अनंत यादव (दिघी आळंदी वाहतूक विभाग), पोलीस हवालदार संतोष अस्वले (गुन्हे शाखा युनिट चार), पोलीस नाईक महेश बारकुले (तळेगाव दाभाडे), पोलीस नाईक विष्णू भारती (पिंपरी) पोलीस शिपाई मारोतराव जाधव (चाकण वाहतूक विभाग).
















