- तरुणीची पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- तरुणी पिंपरी परिसरात हॉस्टेलवर राहते. तरुणी फोन करत नसल्याच्या कारणावरून आरोपी तिच्या हॉस्टेलवर गेला आणि तिथे गोंधळ घातला. तरुणीला शिवीगाळ करून तिच्या गाडीचा पाठलाग केला. सार्वजनिक रस्त्यात गाठून तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग केला.
आरोपीने तरुणीला फोनवर धमकी दिली. हा प्रकार पिंपरी परिसरात ३१ जानेवारी ते २५ मार्च या कालावधीत घडला. सुनील अशोक कोलते (वय २३, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















