- सहा जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२१) :- प्रेम त्रिकोणातून झालेल्या वादात एकावर कोयत्याने वार करून मारहाण केल्याची घटना बोल्हाईचा मळा परिसरात घडली. या प्रकरणी सहा जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रोहित फांदे, रोहित वावरे, आकाश भुतावळे, प्रथमेश तुर्कमारे ( चौघे रा. पिंपरी), विजय वारे, सार्थक साळवे (रा. जाधववाडी, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. दत्ता प्रल्हाद सोनवणे (वय २०, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी घरासमोर उभे असताना आरोपी भुतावळे याने प्रकरण मिटवायचे असल्याचे सांगून गाडीवर बसवून बोल्हाईचा मळा येथे नेले. मैत्रिणीचा नाद सोडून दे. ती आकाशची आहे, असे म्हणत फांदयाने फिर्यादीच्या पाठीवर आणि कपाळावर कोयत्याच्या उलट्या बाजूने वार करीत गंभीर जखमी केले. वारे याने लोखंडी फायटरने पोटावर आणि छातीवर मारहाण केली.
















