- परस्परविरोधी गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२१) :- दोन गटामध्ये वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. यात लोखंडी रॉड, दांडके, फायटरने मारहाण केली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे सोमवारी (दि. २९) रात्री ही घटना घडली.
पहिल्या प्रकरणात अनिकेत अनिल जाधव (वय १९, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ३०) फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल रणखांब, आकाश रणखांबे, संजय कांबळे, दीपक जावले, इश्वर कांबळे, अजय लोंढे (सर्व रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यासह बाळा कांबळे आणि बाळा जावळे (दोन्ही रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र हे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दारू पित होते. त्यावेळी फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपीनी लोखंडी रॉडने मारहाण केली. यात फिर्यादी जबर जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे चुलते विष्णू मुंजाजी रणखांबे यांच्या घरी जेवण करायला जात होते. त्यावेळी आरोपी अनिकेत जाधव व रोहित शिंदे यांनी फिर्यादीला लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचा भाऊ त्यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात घेऊन गेला असता, आरोपीनी विशाल रणखांबे याला वायसीएम हॉस्पिटलमध्ये फायटरने मारहाण करून जबर जखमी केले. फिर्यादीचे मामा संजय बाबूराव कांबळे हे फिर्यादीला भेटायला हॉस्पिटलमध्ये येत असताना आरोपींनी त्यांनाही फायटरने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दुसऱ्या प्रकरणात आकाश युवराज रणखांबे (वय २६, रा. पिंपरी ) याने मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत शिंदे अनिल जाधव, सुशांत अनिल जाधव, रोहित शिंदे, (सर्व रा. पिंपरी), आतुल डोंगरे (रा. पिंपरी) व त्यांचे साथीदार यांच्याविरोधात फिर्यादी दाखल आहे. आरोपी रोहित शिंदे याला अटक करण्यात आली आहे.