न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२१) :- शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे.
विनामास्क फिरणाऱ्या ४१६ नागरिकांवर पोलिसांनी मंगळवारी (दि. ३०) कारवाई केली. एमआयडीसी भोसरी (५२), भोसरी (९), पिंपरी (११), चिंचवड (७३), निगडी (७१), आळंदी (११), दिघी (७६), हिंजवडी (१२), चिखली (१०), रावेत चौकी (२०), म्हाळुंगे चौकी (११) या पोलीस ठाणांकडून कारवाई करण्यात आली.