- च-होलीतील हॉटेल रसरंगवर पोलिसांचा छापा; मालकावर गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२१) :- देशी – विदेशी दारू व बिअर बाटल्यांची विनापरवाना विक्री होत असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी छाप टाकला. यात ३० हजार ८३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. च-होली फाटा, दिघी येथे शनिवारी (दि. ३) सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
गणेश रामदास बवले (वय ३५, रा. वडगाव घेनंद, ता. खेड), याच्याविरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा च-होली फाटा येथील हॉटेल रसरंग व्हेज नॉनव्हेज या हॉटेलचा चालक व मालक आहे. तो त्याच्या हॉटेलमध्ये देशी व विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या ग्राहकांना विक्री करीत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
यात पाच हजार ७० रुपयांची रोकड तसेच २५ हजार ७६४ रुपये किमतीच्या देशी विदेशी दारू व बिअरच्या १७६ बाटल्या, असा एकूण ३० हजार ८३४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.