- आठ जणांवर गुन्हा दाखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२१) :- जुगार अड्यावर छापा टाकून २३ हजार ६० रुपयांची रोकड, तसेच जुगार खेळण्यासाठीचे ५० रुपये किमतीचे पत्ते, असा २३ हजार ११० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
रावेत येथे रविवारी (दि. ४) ही कारवाई करण्यात आली. दामू शिवप्पा राठोड (वय ४०, रा. पाटीलनगर, बावधन), गणेश सोमू राठोड (वय ३६, कैलासनगर, वाकड) व इतर सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी राजेश कोकाटे यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील भोंडवे कॉर्नर येथे एका प्लॉटमधील पत्र्याच्या शेड समोरील मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी रविवारी सापळा रचून कारवाई केली. यात २३ हजार ६० रुपयांची रोकड तसेच ५० रुपये किमतीचे जुगाराचे पत्ते, असा एकूण २३ हजार ११० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, ड पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.