- काळेवाडीतील महिलेची दाम्पत्याकडून ६५ लाखांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२१) :- जादा परतावा देण्याच्या आमिषाने दाम्पत्याने महिलेला ६५ लाखांना गंडा घातला. हा प्रकार सन २०१७ ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला. संतोष कचरू भागरे आणि त्याची पत्नी (दोघे रा. पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी सुरेखा दीपक जगताप (४७, रा. काळवाडी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी संतोष याने तुम्ही मला काही पैसे द्या, मी तुम्हाला त्याच्या मोबदल्यात ज्यादा मोबदला देऊन तुमचे पैसे परत करतो, असे म्हणत फिर्यादी आणि त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर स्टेम्प पेपरवर पैसे हातउसने घेत असल्याचे लिहून दिले. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींना ६५ लाख ६६ हजार ५२० रुपये आरटीजीएस आणि रोख स्वरूपात दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना त्यांचे पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली.