- पालिकेकडून आयकॉन व डिव्हाईन हॉस्पिटल्सला व्यवस्थापनेचा ठेका…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- चिखली घरकुल येथील एफ -१९ आणि बी-२ या दोन इमारतींमध्येही प्रत्येकी २०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू केले. त्यासाठी १ कोटी ३२ लाख रुपये खर्च होणार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. महापालिका आयुक्तांच्या १९ मार्च रोजीच्या प्रस्तावानुसार चिखली घरकुल येथील डी-५ आणि डी -६ या दोन इमारतींमध्ये २०० बेडचे कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले.
त्यानंतर कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने घरकुल येथील डी -७ आणि डी -८ या दोन इमारतींमध्येही कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले. तेथे सध्या पूर्ण क्षमतेने रूग्ण दाखल आहेत. या ठिकाणी आयकॉन हॉस्पिटल यांना एका इमारतीतील २०० बेडसाठी प्रतिदिन प्रतिवेड ५४३ रुपये या दराने कामाचे आदेश देण्यात आले आहेत. आयकॉन हॉस्पिटल यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून त्यांना दुसऱ्या टप्यात रूग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे आयकॉन हॉस्पिटल यांना तातडीची बाब म्हणून चिखली घरकुल येथील एफ-१९ या इमारतीत २०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच बी-९ या इमारतीत कोरोना केअर सेंटर सुरु करण्यासाठी डिव्हाईन हॉस्पिटल यांना कामाचे आदेश दिले आहेत. या दोन्ही रुग्णालयांना २२ एप्रिल ते २१ मे या दोन महिने कालावधीसाठी कोरोना केअर सेंटर चालविण्यास देण्यात येणार आहे. एका इमारतीसाठी ६६ लाख २४ हजार खर्च होणार आहे. अजून २०० बेडचे सेंटर देता येऊ शकत असल्याचे दिसून येत आहे. चिखली घरकुलमधील एफ-१९ आणि बी-१ या दोन इमारतीही कोरोना केअर सेंटरसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात रुग्णसंख्या कमी असल्याने कोरोना केअर सेंटर सुरू केले नव्हते.