- विनामास्क फिरणाऱ्या ४७५ नागरिकांवर खटले दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मे. २०२१) :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना शनिवार व रविवारी घरात थांबावे लागते. मात्र, सोमवारी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून अनेक जण नियमांचे उल्लंघन करतात. अशाच पद्धतीने विनामास्क फिरणाऱ्या ४७५ नागरिकांवर पोलिसांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.१०) कारवाई केली.
एमआयडीसी भोसरी (५२), भोसरी (८), पिंपरी (९), चिंचवड (३८), निगडी (१७१), आळंदी (२२), चाकण (४८), दिघी (१०), सांगवी (१७), वाकड (१६), हिंजवडी (९), देहूरोड (१९), तळेगाव दाभाडे (८), तळेगाव एमआयडीसी (०), चिखली (८), रावेत चौकी (१०), शिरगाव चौकी (२३), म्हाळुगे चौकी (७) या पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी सोमवारी ४७५ जणांवर कारवाई केली.
नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. मात्र, तरीही काही बेशिस्त नागरिक घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
















