न्यूज पीसीएमसी नेटवर्क
राज्य सरकारकडून शहरातील विद्युतदाहीन्यांच्या खर्चाला हिरवा कंदील…
निगडीतील विद्युतदाहीनीचंही रुपडं पालटणार..
अंत्यविधी कमी वेळेत होणार..
पिंपरी (दि. १७. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला चाळीस ते पन्नास रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मृतांच्या अंतिम संस्कारासाठी शहरातील विद्युत दाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडत होता. महापालिकेने राज्य शासनाकडे अतिरिक्त विद्युत दाहिन्या बसविण्याकामी प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. राज्य सरकारने नियोजित खर्च सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे निगडी स्मशानभूमीसह शहरात काही अपेक्षित ठिकाणी नवीन विद्युत दाहिन्या बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात दररोज अंत्यसंस्कारासाठी किती मृतदेह येतात. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी किती विद्युतदाहीन्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्युत दाहीन्यांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून, मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना राज्य सरकारने महापालिकेला केल्या आहेत. विद्यत दाहीन्यांसाठी जवळपास २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
प्रभाग क्रमांक १३, निगडी अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी निगडी, यमुनानगर, मोरेवस्ती, आकुर्डी, तळवडे, त्रिवेणीनगर, रुपीनगर, कृष्णानगर, संभाजीनगर, प्राधिकरण या परिसरातून अंत्यविधीसाठी मृतदेह येत असतात. त्यामुळे येथील विद्युत दाहिन्यांवर मोठा ताण पडत असे. प्रसंगी मृतदेहांची हेळसाड होत असे. याची दखल घेत, प्रभागातील आम्ही चारही विद्यमान नगरसेवकांनी परिसरात नव्याने गॅसदाहिनी व विद्युत दाहिनी बसविण्यासाठी पालिका प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेरीस आम्हाला शासनाकडून बजेट मिळविण्याकमी यश आले आहे. त्यामुळे आता अंत्यविधी कमी वेळेत होतील. त्याचा सर्व खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आम्ही आभार मानतो.
– सचिन चिखले, नगरसेवक तथा गटनेता, पिं. चिं. मनपा….
पिंपरी चिंचवड महापालिकेने विद्युत दाहीन्यांच्या वाढत्या मागणीमुळे शहरात नवीन विद्युत व गॅस दाहीन्या बसविण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला होता. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली. नवीन विद्युत दहीन्यांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना राज्य सरकारने महापालिकेला केल्या आहेत.
–











