- पिं. चिं. शहरात आज ४२१ जणांना बाधा; १८ रुग्णांचा मृत्यू तर, ८९४ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ३) रोजी ४२१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २५१४७८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २४२६८० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४११८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या १८ एवढी आहे.

















