- पालिकेच्या ‘मी जबाबदार अॅप’वर शुक्रवारीही करू शकता नाव नोंदणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असणाऱ्या वय १८ ते ४४ वर्षे वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation latter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.) या कागदपत्रांच्या पुराव्यासह महापालिकेच्या ‘मी जबाबदार या अॅप’वर दि.०३ जून २०२१ रोजी पर्यंत नोंदणी करणे आवश्यक होते.
परंतु, लाभार्थ्यांसाठी ‘मी जबाबदार अॅप’वर नोंदणी करण्यासाठी (दि. ०४ जून) शुक्रवारी रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंतचा कालावधी वाढविण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरामधील रहिवासी असलेल्या वय १८ ते ४४ वर्षे वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करावी.
या कालावधीमध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ देणेकामी त्यांनी केलेल्या नोंदणीच्या आधारावर व सोबत सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मान्यता देण्यात येईल. नोंदणी मान्य झाल्यास संबंधितांना लसीकरणाची तारीख, वेळ व ठिकाण एसएमएसव्दारे कळविण्यात येईल. त्याआधारे संबंधित लाभार्थींनी मुळ कागदपत्र व छायांकित प्रतिसह लसीकरणाच्या ठिकाणी उपस्थित राहवयाचे आहे. कागदपत्रांची छाननी करुन लसीकरणास पात्र असलेबाबत संबंधित प्रभारी वैद्यकिय अधिकारी यांचेमार्फत मान्यता देणार आहे. मान्यता दिलेल्या लाभार्थींना लसीकरण करण्यात येईल.
मी जबाबदार ऍप वर दि.०४ जून २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत नोंदणी केलेल्या लाभार्थींनी लसीकरण करणेकामी दि. ०५ जून २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात सकाळी-१० ते ०५ या वेळेत उपस्थित राहणे अपेक्षित आहे. ज्या लाभार्थ्यांनी मी जबाबदार ऍपवर नोंदणी केलेली नाही अथवा एसएमएस प्राप्त नाहीत अशांचा विचार करण्यात येणार नाही. लाभार्थ्यांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मी जबाबदार या ऍप वर दर गुरुवार ते बुधवार पर्यंत नोंदणी चालू राहिल व या कालावधीत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचे आठवडयामधील दर शनिवारी नवीन जिजामाता रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे.

















