- आजपासून चार वाजेपर्यंत शहरातील सर्व दुकाने सुरु…
- व्यायामशाळा, सलून, ब्यूटीपार्लर, स्पा यांचाही समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहराचा पॉझिटिव्हिटी रेट साडे आठ टक्क्यांवर आल्याने शहरात सोमवारपासून अनलॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय व मॉल वगळता सर्व दुकाने सुरू राहणार आहे. रविवारी बाजारपेठेमध्ये दुकानदारांची तयारी सुरु होती.
पिंपरी – चिंचवड महापालिका परिसरात फेब्रुवारीच्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट झाली होती. गेल्या आठवड्यापासून ही लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अडीच लाखांवर, तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दोन लाख चाळीस हजारांवर पोहोचली आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये २ हजार लोक उपचार घेत आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन हजारपर्यंत पोहोचली आहे.
त्यामुळे आज सोमवारपासून शहरातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट, फूडकोर्ट सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, मैदाने पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील. सामाजिक धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमासाठी पन्नास लोकाच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी. लग्नसमारंभासाठी २५ ऐवजी आता पन्नास लोकांच्या उपस्थितीतीला परवानगी व्यायामशाळा, सलून, ब्यूटीपार्लर, स्पा आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. पीएमपीएमएल ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी आहे. आंतरजिल्हा बंदी उठवण्यात आली आहे.
शहर परिसरात सायकाळी पाचनंतर संचारबंदी लागू करण्यात येईल. शहर परिसरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद राहतील. ऑनलाइन शिक्षणास परवानगी. शहर परिसरातील बाजारपेठामध्ये एक दिवस आणि एक सम विषम पद्धतीने ५० टक्के दुकानांना चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दुकानदार दुकान मालक यांना अँटीजन तपासणी तपासणी पंधरा दिवसांनी करणे अत्यंत आवश्यक आहे. शहरातील मॉल, सिनेमा, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहतील.
















