- अध्यक्ष व संचालकांच्या चुकीमुळे बँकेवर प्रशासकाची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२१) :- पिंपरीतील दी सेवा विकास बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने अखेर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. संचालक मंडळाने केलेल्या कामकाजात अनेक त्रुटी व अनियमितता दिसून आल्याने प्रशासक नेमण्याचे आदेश भारतीय रिजर्व्ह बँकेचे महाप्रबंधक संजय कुमार यांनी काढले आहेत.
बँकेच्या गैरव्यवहारात सहभागी आरोपावरून माजी अध्यक्षांसह संचालकांवर फौजदारी कारवाई झाली आहे. गणेश आगरवाल यांना बँकेवर प्रशासक नेमले आहे. महाराष्ट्र को – ऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्टनुसार आदेश काढला आहे.
मार्च २०१८ मध्ये बँकेमध्ये एकूण ठेवी ८२३ कोटी इतक्या रकमेच्या होत्या. कमी होऊन ३१ मार्च २०२१ पर्यंत ४०९ कोटींपर्यंत कमी झाल्या आहेत. काही कर्ज खात्यांची तपासणी करण्याचेही आदेश सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी दिले होते. आता नवनियुक्त प्रशासक गणेश आगरवाल हे बँकेचे प्रशासकीय कामकाज पाहतील.
















