- वेश्या व्यवसायास पाडले भाग; सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जून २०२१) :- युगांडतील परंतु सध्या भारतात राहणारी आरोपी महिलेने फिर्यादी पीडित तरुणीला कॉल सेंटरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने भारतात बोलावले. पीडित तरुणी २५ जानेवारी २०२० ला मुंबई विमानतळावर आली. आरोपीने एका व्यक्तीला फिर्यादीला आणण्यासाठी पाठवले. त्या व्यक्तीसोबत फिर्यादी नवी सांगवीत आली.
आरोपीने फिर्यादीचा पासपोर्ट काढून घेतला. ‘तुला मी सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागेल; अन्यथा मी तुझा पासपोर्ट तुला परत देणार नाही’, अशी धमकी दिली. फिर्यादी या आरोपी सोबत काम करण्यास तयार झाली. आरोपीने फिर्यादी तरुणीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार १० जून रोजी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्राॅल्सी असे या आरोपी महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३७०, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

















