- दिघीत कोयता घेऊन माजविली दहशत; एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२१) :- दुचाकीवर बसून हातात लोखंडी कोयता घेऊन तो इकडे तिकडे भिरकावून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. कोणाला लय माज आलाय का, मी इथला दादा आहे, एकएकाला बघून घेतो, असे मोठ्याने ओरडून दहशत माजवली.
पिरॅमिड हॉटेल चौक, दिघी- भोसरी रोड, दिघी येथे बुधवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलीस नाईक हेमंत आव्हाड यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साहिल सनउल्ला शहा (वय २३, रा. गजानन महाराज नगर, दिघी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.