न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२१) :- चिंचवडच्या मोहननगर येथे बिल्डिंगची स्टोअर रूम कुलूप लावून बंद होती. स्टोअर रूमच्या दरवाजाची लोखंडी पट्टी उचकटून अज्ञात चोरट्यांनी २४ मे ते ३० जून या कालावधीत ५ लाख २६ हजार २०० रुपये किमतीचे केबल वायरचे २१ बंडल चोरून नेले.
ही घटना बुधवारी (दि. ३०) सकाळी पवार बिल्डींग येथे उघडकीस आली. श्रद्धेश जयप्रकाश पवार (वय २४, रा. चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.