- चिखलीतील घटना; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२१) :- लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली येथे मार्च २०१५ ते २४ जून २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
कृष्णाथ नागनाथ पुरी (वय २७. रा. रुपीनगर, तळवडे), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादी महिलेच्या भोळेपणाचा फायदा घेऊन, तिचा विश्वास संपादन करून फसवणूक करून आरोपीच्या राहत्या घरी बोलावून बलात्कार केला. तसेच आरोपीने संशयाच्या कारणावरून फिर्यादी महिलेला हाताने मारहाण केली.