- दारुड्यांकडून वाहनचालकांवर कोयत्याने सपासप वार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२१) :- पिंपळे निलख येथील रस्त्यावर दारूच्या नशेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दारुड्यांनी कोयत्याने वार केले. यातील एकजण वाहनांना थांबवायचा आणि दुसरा कोयत्याने वार करायचा. काही दुचाकी चालक जखमी होण्यापासून बचावले. तर चारचाकी वाहनांचे आरोपींनी नुकसान केले आहे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सांगवी पोलिसांनी घटनेचा छडा लावून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच दोघांना अटक केले आहे. घटना घडली त्याच दिवशी या गुंडांनी पैशांसाठी एका व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिक संतोष खरात व चेतन जावरे अशी आरोपींची नावे आहेत. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
















