- जवळपास पाचशेपेक्षा अधिक रहिवाशांचा सहभाग..
- भाजप नगरसेवक शैलेश मोरेंचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जुलै. २०२१) :- कोरोनावर मात करण्यासाठी भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक १९ चिंचवडच्या एम्पायर इस्टेट सोसायटीतील सदस्यांसाठी कोविड लसीकरण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन दिवसीय शिबीरात जवळपास ५३८ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. हे शिबीर शनिवारी व रविवारी (दि. ३ व ४ जुलै) रोजी सोसाटीच्या क्लब हाऊस क्रमांक १ येथे संपन्न झालं.
शिबीर यशस्वी करण्यासाठी फिनिक्स हॉस्पिटल, पिंपरीतील वायसीएम व चिंचवडच्या आदित्य बिर्ला रुग्णालयांच्या डॉक्टरांची टीम, डॉ. माधव चव्हाण, साम्राज्य इस्टेट फेडरेशनचे पदाधिकारी, मित्रमंडळ व रहिवाशांनी परिश्रम घेतले.
नगरसेवक शैलेश मोरे माहिती देताना म्हणाले, भविष्यात कोविड तिसऱ्या लाटेची तज्ञांकडून भीती वर्तविली जात आहे. या लाटेपासुन सुरक्षित राहण्यासाठी व कोरोनाला एकत्रितपणे पराभूत करण्यासाठी सोसायटीत शनिवारी व रविवारी दोन दिवसीय कोविड लसीकरणाचं सत्र आयोजित करण्यात आलं होतं. शनिवारी ४५ वर्ष वयोगटातील ३५८ व रविवारी १४० लाभार्थ्यांना कोविशिल्ड (Covishield) लसीचा पहिला व दुसरा डोस मोफत देण्यात आला. रविवारी (दि. ४) रोजी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ४० लाभार्थ्यांना कोविडचा स्पूटनिक व्ही (Sputnik V) हा पहिला डोस देण्यात आला. अशा जवळपास ५३८ नागरिकांचं पालिकेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत लसीकरण करण्यात आले. सोसायटीमध्ये कोविड शिबीर राबविण्याचा अनोखा पायंडा एम्पायर इस्टेट सोसायटीने पाडला आहे. या उपक्रमास सहाय्य करणाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.
















