- प्रदेशाध्यक्ष पाटील व विरोधी पक्षनेते फडणवीसांची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जुलै. २०२१) :- भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारपासून (दि. ६) शहर भाजपातर्फे कार्यकर्ता महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे एक हजार कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेट देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या अडचणी जाणून, मार्गदर्शन करत संघटन मजबुतीसाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे तसेच माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान होणार आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने बूथ मजबुतीकरणाला सुरवात केली आहे. त्याद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक विधानसभा मतदार संघातील बूथ प्रमुखांशी संपर्क साधणार आहेत.
















