न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जुलै. २०२१) :- नालेसफाई करताना पिंपरी – चिंचवड शहरात आजही कर्मचाऱ्यांना अनेक भागात हाताने मैला साफ करावा लागत आहे. याबाबत तक्रार निवारण न झाल्याने पूर्णत: अपयश आले आहे. या प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना नोटीस बजावली आहे.
याबाबत येत्या ८ व ९ जुलैला दिल्ली मुख्यालय येथे सुनावणी होणार आहे. आयोगाने यापूर्वीही नोटीस बजावली आहे. २०१७ मध्ये दोन विविध घटनांमध्ये नालेसफाई करताना भारत डावखर आणि बाळू सोनवणे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
















