न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जुलै. २०२१) :- महामेट्रोच्या वतीने पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड शहरात चाचण्या सुरु आहेत. रविवारी (दि. ४) पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली.
मेट्रोचा वेग, वाहतूक सुरक्षा, सिग्नल यंत्रणा व इतर तांत्रिक बाबी योग्य आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी ही चाचणी केली जात आहे, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिका भवन स्टेशन ते दापोडी स्थानकापर्यंत डिसेंबर २०२१ पर्यंत मेट्रो सुरू करण्याचे महामेट्रोने नियोजन केले आहे. त्यादृष्टीने काम सुरु आहे. सर्व परवाने मिळाल्यानंतरच मेट्रो सुरू होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.