- फिर्यादीचे वडील व चुलत्यांनाही आरोपीकडून मारहाण; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :-रिक्षा (एम एच १२ / एच सी ०१३०) ही मंगळवारी रात्री घराजवळ पार्क केली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपीने रिक्षा जाळली. रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
फिर्यादीचे वडील आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना मारहाण केली. फिर्यादीचे चुलते यांनाही मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास भैरवनाथनगर, वैदुवस्ती, पिंपळे गुरव येथे घडला.
अमोल संजय जाधव (वय २५, रा. भैरवनाथ नगर, वैदु वस्ती, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अक्षय शिंदे (रा. भैरवनाथ नगर, वैदु वस्ती, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
















