- एकाला साडेसात लाखांचा गंडा; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- आकुर्डीतील बजाज कंपनीत मोठा ऑफिसर म्हणून मी नोकरीस आहे. कंपनीतुन हाफ किमतीत ३२ गाड्या काढून देतो, असे सांगून आरोपींनी फिर्यादीकडून सात लाख ६० हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही गाड्या दिल्या नाहीत.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शंकरलाल लालचंद बखत्यारपुरी (वय ५०, रा. वैभवनगर सोसायटी, पिंपरी) यांनी अविनाश जाधवाणी (वय २५), आकाश जाधवाणी (वय २१, दोघे रा. सुखवाणी केसल सोसायटी, पिंपरीगाव) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२० ते १३ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घडला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















