- आवास योजनेअंर्तगत कागदपत्रांची पडताळणी अद्यापही सुरूच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२१) :- प्रधानमंत्री आवास योजनेअंर्तगत विजेता यादीमध्ये नाव असलेल्या लाभार्थीची प्रलंबित कागदपत्रे तपासणी झोनिपु कार्यालय, चिंचवड येथे करण्यात येत आहे. २ हजार ७५० जणांची कागदपत्रे तपासण्यात आली आहेत.
महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चऱ्होली, बो-हाडेवाडी व रावेत येथे ३ हजार ६६४ सदनिका बांधण्यात येत आहेत. त्यासाठी सोडत काढण्यात आली होती. सोडतीत नंबर लागला नाही, अशा ३८ हजार लोकांचे अर्ज दाखल करताना भरलेले शुल्क परत करण्यात आले आहेत.
कागदपत्रे अपुरे असलेल्या लाभार्थ्यांना पालिकेकडून पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. आजवर २७५० लोकांना बोलविण्यात आले. यापैकी दोन हजार शंभर नागरिकांनी कागदपत्रे जमा केली असून काहींची कागदपत्रे पडताळणी बाकी असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.












