- १७ मुख्य लिपिक आता मुख्य आरोग्य निरीक्षक, ४ आरोग्य निरीक्षकांनाही बढती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना सहशहर अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच, कार्यालयीन अधिक्षकपदी १७ मुख्य लिपिकांची आणि मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून ४ आरोग्य निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे.
मुख्य लिपिक असलेले नामदेव लांडगे, काळूराम बवले, शशिकांत जगताप, संजय चव्हाण, मनीषा देशपांडे, श्रद्धा बोर्डे, संजीव भांगले, बाळू गंधट, सुषमा भरवीरकर, नरेशकुमार इदनानी, निशा आहेर, अनिता मालपाठक, मनाली राणे, उल्हास देवचके, राजू चंदीरामानी, गोरक्षनाथ लिमण, ज्ञानेश्वर हवळे यांना कार्यालयीन अधिक्षक म्हणून पदोनती देण्यात आली आहे.
आरोग्य निरीक्षक सुनील वाटाडे, शांताराम माने, वसंत सरोदे, महेश आढाव यांची मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. ज्येष्ठतेनुसार या पदोन्नती दिल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.












