- ऑगस्टपासून वितरण; लाभ घेण्याचे पीएमपीचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२१) :- पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी पीएमपीच्या पास केंद्रावर १९ ते २६ जुलैपर्यंत ‘मी कार्ड’चे नवीन रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
दैनंदिन प्रवासासाठी पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील नागरिकांनी पीएमपीचे मासिक पास काढले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मी – कार्डमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने अखेर पीएमपी प्रशासनाकडून मी – कार्ड सेवा बंद करण्यात आली.
आता ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील २३ पास केंद्रावर यासाठी रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. नवीन मी – कार्डचे वितरण ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.