- सर्व भजनी मंडळांचे कार्य खऱ्या अर्थाने लोकसेवेचे – आ. लांडगे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२१) :- मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तनगर परिसरातील श्री दत्त महिला भजनी मंडळ यांना नगरसेविका अनुराधा गोरखे व प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते भजन साहित्य वाटप करण्यात आले.
आमदार लांडगे म्हणाले, भजनी मंडळ एका अर्थाने लोकसेवेचे काम करीत आहे. एक वेगळा उपक्रम गोरखे परिवाराच्या वतीने घेतला आहे. मंदिरांमध्ये अथवा घरात बसून एकचित्ताने भजन म्हणून देवाची प्रार्थना करणे व मन शांतीचा शोध घेणे ही एक प्रकारची लोकसेवा आहे.
यावेळी माजी उपमहापौर तुषार हिंगे, अनुसूचित जाति मोर्चा अध्यक्ष सुभाष सरोदे, भाजपा स्वीकृत नगरसेवक सुनील कदम, शुभांगी कसबे, निर्मला अलंकार, यशवंत दनाने, नेताजी शिंदे, विजय वाघमारे, अजिंक्य गोळे, विठ्ठल शिंदे, तानाजी साठे, सुनील शेलार, रोहन खुडे, भानुदास नेटके, प्रशांत शिंदे, अमोल कुचेकर, मनोज कसबे, राजू विटकर, गणेश लोंढे आदी उपस्थित होते.
तान्हाजी साठे यांनी सूत्रसंचालन तर, अमित गोरखे यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी आभार मानले.












