- दुचाक्यांसह चक्क सायलेन्सरची चोरी; गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरटे सुसाट झालेले आहेत. दुचाकी व चक्क गाडीचा सायलेन्सर चोरीला गेल्याच्या तक्रारी गुरुवारी (दि. २२) रोजी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
यात मोशीतील बनकर वस्तीत सात जुलै रोजी रात्री साडेअकरा ते आठ जुलै रोजी सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी वीस हजारांची दुचाकी (एम एच १४ / डी वाय ६२६१) चोरून नेली. याबाबत परमेश्वर अंबादास गवळी (वय ४०, रा. बनकर वस्ती, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिखली कृष्णानगर पोलीस लाईन येथून २० जुलै रोजी रात्री साडेनऊ ते २१ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या (एम एच १४ / एच डी १९०५) या गाडीचा वीस हजार रुपये किमतीचा सायलेन्सर चोरीला गेला आहे. सुरेश रामकिशन पवार यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जुनी सांगवी आनंदनगर येथून एका घरासमोरून पाच हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच १४ / बी ई २०११) चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना २१ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत प्रशांत विश्वनाथ विभुते (वय ४८) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रावेतमधील एका सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी पंचवीस हजारांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार बुधवारी (दि. २१) सायंकाळी उघडकीस आला. याबाबत स्वप्नील संजय जाधव (वय ३१ रा. रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.