- वेश्या व्यवसायप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथे आरकेएल बिझनेस सेंटरमध्ये असलेल्या झेन स्पा या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सेंटरवर छापा मारला.
यामध्ये पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली. तसेच १२ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २२) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास झेन स्पा नावाच्या स्पा सेंटर येथे करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळुंके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रकाश उर्फ पप्पू उत्तम अडसूळ (वय ४५, रा. अहिंसा चौक, चिंचवड), प्रवीण माधवराव सूर्यवंशी (वय २७, रा. रहाटणी) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.