- अन्यथा पालिकेच्या निवड यादीतुन नाव रद्द होण्याचा धोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोनिपु विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबविणेत येत असुन या योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करणेसाठी अंतिम मुदत दि. ३० जुलै २०२१ रोजी साय.५ वा. पर्यंत देण्यात आली आहे.
कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यास या लाभार्थ्यांचे नाव निवड यादीतुन रद्द करण्यात येईल. या योजनेत निवड झालेल्या व अद्यापपर्यंत कागदपत्रे सादर न केलेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र सादर करावीत, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
या योजनेत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी रावेत येथे ९३४, बोऱ्हाडेवाडी येथे १२८८, चऱ्होली येथे १४४२ असे एकुण ३६६४ सदनिका वाटप करण्यासाठी योजना राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. निवड झालेल्या परंतु कागदपत्रे सादर करण्याकरीता उपस्थित न राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या नोटीस बोर्डवर लावणेत आली आहे.
महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर (www. pcmcindia.gov.in/ marathi/ pmay_iresult.php) देखील ही यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.